विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार जाहीर

विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार जाहीर

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केले आहे.
  
मुंबई दि.10मे: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केले आहे. राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना विधान परिषदेचं तिकीट जाहीर झालं आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

विधानपरिषदेसाठी शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांचे नावं अनेक दिवसांपासून चर्चेत होते. शशिकांत शिंदे यांना माथाडी कामगार नेते म्हणून ओळखले जाते. तर अमोल मिटकरी यांनी विधानसभेच्या निवडणुकीवेळी जोरदार प्रचार केला होता. प्रचारादरम्यान त्यांची भाषणं प्रचंड गाजली होती. पक्षात त्यांचा एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी यांचं अनेकदा जाहीरपणे कौतुकही केलं आहे. अखेर त्यांना पक्षाकडून विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळाली आहे.

हेही वाचा- MLC: असंच चालू राहिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही, उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेसला निरोप

विधानपरिषदेत भाजप 3, राष्ट्रवादी काँग्रेस 3 , काँग्रेस 2 आणि शिवसेनेचे 1 सदस्य निवृत्त झाले आहेत. आता संख्याबळानुसार यंदा निवडणुकीत निवडून येण्यासाठी 29 मतांचा कोटा आवश्यक आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आधीच उमेदवार जाहीर केले आहेत. उद्धव ठाकरेंसह नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान