ब्युटी पार्लर आणि सलूनबाबत गृहमंत्रालयाची नियमावली जारी

ब्युटी पार्लर आणि सलूनबाबत गृहमंत्रालयाची नियमावली जारी |

4 मेपासून सुरु होणाऱ्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या भागात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून उघडण्यास सशर्त परवानगी असेल, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केलं.

               
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. येत्या 3 मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान काही गोष्टींवर सूटही देण्यात आली आहे. 4 मेपासून सुरु होणाऱ्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या भागात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून उघडण्यास सशर्त परवानगी असेल, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केलं. त्याशिवाय, इ-कॉमर्स कंपन्या या क्षेत्रात अत्यावश्यक सामांनांव्यतिरिक्त इतर सर्व वस्तूंची विक्री करु शकतील.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून उघडण्याची परवानगू असेल. येत्या 4 मेपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून चालक त्यांची दुकानं उघडू शकतील, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने दिली. मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य. असेल

रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय नाही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नवी नियमावली जारी केली आहे. ही नियमवामली फक्त काही मर्यादित क्षेत्रात लागू असेल. यानुसार, गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या,  ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात आले आहेत.

– दुकानांवर एकमेकांपासून जवळपास सहा फुटांचं अंतर ठेवावं.
– दुकानावर एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती नको.
या नियमांनुसार, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील दुकानं उघडं ठेवता येणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान