नांदेडात आणखी १ कोरोनाबाधित रुग्ण बारड येथे आढळून आला

मुंबई येथून हॉटस्पॉट क्षेत्रातून बारड येथे आला होता।        
नांदेड:- मुंबई येथून बारडला परतलेल्या एका कुटुंबातील २२ वर्षाच्या तरुणाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.

हे कुटुंब मुंबईत कामासाठी गेले होते. त्यांनी बारडकडे येण्यासाठी मुंबईहुन पायी निघाले होते. त्यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश होता. मंठा येथून एक वाहन मिळाल्यानंतर हे सर्व जण दोन दिवसांपूर्वी बारडला पोहचले होते. यानंतर त्यांना क्वांरटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते.

त्यामध्ये एक जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. यामुळे माहूरनंतर आता बारडमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.आजपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या बारडमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान मुंबई येथून निघताना यांची कुठेही तपासणी झाली नाही असेच दिसून येते. 

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान