रमजान ईद होई पर्यंत नायगाव तालुक्यातील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश द्यावे :: सय्यद अजिम नरसीकर

रमजान ईद होई पर्यंत नायगाव तालुक्यातील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश द्यावे :: सय्यद   अजिम नरसीकर

प्रतिनिधि :- बल्खी आसद


जगभरात कोरोनाव्हायरस ने धुमाकूळ घातला असून हजारो नागरिकांना या रोगाची लागण होत आहे. अशा वातावरणात रमजान ईदच्या खरेदीसाठी कापड दुकाने,बुटाचे दुकाने तसेच सौंदर्यप्रसाधनांची दुकाने उघडण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठाणचे नांदेड जिल्हाध्यक्ष सय्यद अजिम नरसीकर यानी नायगाव तहसीलदार यांचाकडे निवेदनाद्वारे केली आहे

  त्यात त्यांनी म्हटले की संपूर्ण जगभरात COVID-19 (कोरोना)या जागतीक महामारीने थैमान घातले असून महाराष्ट्र राज्यात कोरोना बांधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या संकटातून राज्याच्या जनतेला वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे.
 आपला नांदेड जिल्हा ऑरेज झोन मध्ये आहे.नुकताच पवीत्र रमज़ान महिना सुरू झाला असून पुढील काही दिवसात रमजान ईद हि आम्ही घरात राहुनच साजरी करणार आहोत.रमजान ईद निमित्ताने जर नायगाव  तालुक्यातील कापड दुकान,बुट हाउस,सौंदर्यप्रसाधनांची दुकाने व इतर बाजारपेठेतील दुकानावर मुस्लिम समाजाची गर्दी होउ शकते त्यामुळे Social Distancing राहणार नाही.व गर्दीत जर एखाद्या कोरोना बांधीत रूग्ण असल्यास नायगाव तालुक्यात कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रम़जान ईद पुढच्या वर्षी पुन्हा येणार परंतु जिवन पुन्हा येणार नाही म्हणून नायगाव तालुक्यातील जनतेच्या व देशाच्या हितासाठी रमजान ईद होई पर्यंत बाजारपेठे बंद ठेवण्यात यावे असे निवेदन महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठाण संघटने कडुन देण्यात आले आहे यावेळी संघटनेचे
नांदेड जिल्हाध्यक्ष सय्यद अजीम हुशेनसाब नरसीकर,नायगाव तालुका अध्यक्ष शेख ईसा अब्दुल खादर,शेख आलीम लालव॔डीकर.शेख इमाम. बाबाशेठ देगावकर.शेख मैनोदीन.शेख अहेमद.सय्यद चांद पाशा.सय्यद आदम. सय्यद
ईमरान. व महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठाणचे सर्व कार्यकर्त  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान