वाढदिवसाचा खर्च टाळुन राहुल बलशेटवार यांनी केली मुस्लीम महिलांना साडी चोळी वाटप

वाढदिवसाचा खर्च टाळुन राहुल बलशेटवार यांनी केली मुस्लीम महिलांना साडी चोळी वाटप

मुखेड/प्रतिनिध बल्खी आसद

दापका (गु.प.) येथील राहुल बलशेटवार यांनी रमजान महिन्यांचे औचित्य साधुन व वाढदिवसानिमित्त  गावातील गोर.गरिब मुस्लीम  महिलांना साडी चोळी वाटप करण्यात आले.
        या महिन्यात मुस्लीम समाजाचा पवीञ सण रमजान महिना सुरु असुन जवळपास सोळा रोजे (उपवास ) झाले असुन येत्या पंधरा दिवसात रमजान ईद साजरी होणार आहे या रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधवासहीत महिला ही ईद निमित्त कपडे खरेदी करतात पंरतु यावर्षी जगासहीत भारतात व महाराष्ट्रात कोरोना रोगाचा सावट आहे भारतात लॉकडाऊन असुन राज्यात संचारबंदी लागु आहे.अशा भयानक परिस्थितीत सर्वच लोक जवळपास दिड महिन्यापासुन घरातच राहुन कोरोना हरवण्यासाठी प्रयत्न करित आहेत.तर राज्यात दिवसनदिवस वाढत चाललेल्या कोरोना बाधितांचा आकडा कमी करण्यासाठी दिवस राञ एक करुन कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासन  शरतीचे प्रयत्न करित आहे. 
       लॉकडाऊन असल्यामुळे व आर्थिक मंदीमुळे यावर्षी रमजान ईद ची कपडे खरेदी न करता आल्यामुळे कठीण परिस्थिती निर्माण होत आहे.आणि गोरगरिब महीला पैसा नसल्यामुळे कपडे साडी विकत घेऊ शकत नाही  अशा संकटाच्या काळात राहुल बलशेटवार यांनी आपल्या वाढदिवसावर होणारा अनाठायी खर्च टाळुन सामाजिक बांधिलकी जोपासत गावातील गोरगरिब,विधवा,निराधार,व मजूरदार महिलांना साडी चोळी वाटप करुन समाजाप्रति बांधिलकी जपली आहे.त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
       यावेळी दापका येथील मुस्लीम महिलांना साडी चोळी वाटप करताना बालाजी दरडे, ईसाक मरसंगे, इलीयास मारजवाडे, मनोज घोंगडे, बस्वराज दरडे, विजयकुमार घोंगडे, अंकुश घोडके, पुंडलीक जाधव, बालाजी कुंजेटवाड, शंकर रेणकुंठवार, जावेद मंगरुळे,आदि उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान