सावधान नांदेड जिल्हा ग्रीन मधून ऑरेंज झोनमध्ये

नांदेड जिल्हा ग्रीन मधून ऑरेंज झोनमध्ये 
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली वर्गवारी 

 मुखेड /प्रतिनिधि 

नांदेड :- मार्गदर्शक सूचनेनुसार नांदेड जिल्हा (ग्रामीण) ग्रीन झोनमध्ये तर नांदेड महानगरपालिका क्षेत्र ऑरेंज झोनमध्ये आहे. गुरुवारी पाठवलेल्या संशयितांच्या स्वॅबपैकी 3 लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली. नांदेडकरांसाठी चिंता वाढली आज शुक्रवार ता.१ रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान तीन संशयितांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आले आसल्याने आता कोरोना बाधितांचा आकडा सहा वर गेला आहे. मराठवाड्यातील औरंगाबादला रेड झोन तर उस्मानाबादला ग्रीन झोन आहे. मराठवाड्यातील इतर 6 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये महाराष्ट्रात + रेड झोन : १४ जिल्हे + ऑरेंज झोन: १६ जिल्हे - ग्रीन झोन: ६ जिल्हे (उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा) देशात + रेड झोन: १३० जिल्हे + ऑरेंज झोन: २८४ जिल्हे - ग्रीन झोन: ३१९ जिल्हे मागील २१ दिवसात एकही नवीन रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केले जातात.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान