नांदेड शहरातील कंटेनमेंन्टची झोनची संख्या 6 वर!
नांदेड शहरातील कंटेनमेंन्टची
झोनची संख्या सहावर!
नांदेड: – नांदेड शहरात कंटेनमेंट झोनची संख्या वाढत आहे. शहरातील सहा भाग आता कंटेनमेंट झोन मध्ये गेले आहेत. नवा भाग म्हणून कौठा येथील रवीनगर समावेश असणार आहे.
यापूर्वी दि. 22 एप्रिल रोजी पीरबुर्हाण भागात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर दि. 28 एप्रिल रोजी दुसरा रुग्ण सेलू येथील महिला ठरली. त्यानंतर पंजाब येथून भाविकांना सोडून आलेल्या चालकांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यानंतर काही चालक मंडळीमध्ये कोरोनाचे लक्षणे आढळून आली. लंगरसाहिब मधील 20 कर्मचार्यांना लागण झाली. त्याचसोबत अबचल नगर या भागातही रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.
रवी नगर भागातील एक 35 वर्षीय इसमास कोरोनाची लागण झाली. सदरचा इसम चालक असून पंजाब येथून जाऊन आल्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे रवीनगर हा कंटेनमेंट म्हणून सहावा झोन ठरणार आहे. पोलिसांकडून या भागाला सील करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी पीरबुर्हाण नगर, अबचल नगर, नगिना घाट, देगलूर नाका येथील रहमत नगर, सांगवी भागातील अंबा नगर नंतर आता रवी नगरचा समावेश असणार आहे.

Comments
Post a Comment