नांदेडला रविवारी आणखी 6 पॉझिटिव्ह आढळले ! पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 51

नांदेडला रविवारी आणखी 6 पॉझिटिव्ह आढळले ! बाधित रुग्ण संख्या 51

आलेले रुग्ण हे यात्रेकरू आहेत.


नांदेड : आज प्राप्त झालेल्या एकूण 89 अहवालानुसार एन आर आय  यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथील 6 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. तसेच 82 अहवाल हे निगेटिव प्राप्त झाले आहेत. सदरील रुग्णांची प्रकृती सध्यास्थितीत स्थिर आहे.

आज पॉझिटिव्ह अहवाल आलेले 6 रुग्ण हे यात्रेकरू आहेत. ठाणे येथील एक पुरुष, पंजाब मधील 2 रुग्ण (एक महिला) यूपी मधील 3. (तिन्ही महिला) असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 51 वर पोहोचली आहे.
आजतागायत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे  96147 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून 1690 रुग्णांचे स् स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 1571 स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटीव्ह आलेला असून, 37 जणांचा अहवाल प्रलंबित आहे. सदर घेतलेल्या एकूण स्वॅब पैकी 51 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
 असे एकूण 51 पॉझिटिव रुग्णांपैकी 11 रुग्ण हे डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 32 रुग्णांवर आणि माहूर कोविड केअर सेंटर येथे 1 रुग्णावर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

तसेच आज पर्यंत पॉझिटिव रुग्णांपैकी 5 रुग्ण हे मरत पावले आहेत. औषधोपचारासाठी प्रतिसाद न दिल्यामुळे एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यू पावलेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते.
नांदेड जिल्ह्याची वाटचाल रेड झोन कडे होत असल्याकारणाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये तसेच जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान