4 पॉझिटिव्ह रुग्ण गायब, जिल्ह्यातील लोकांची उडाली झोप
पॉझिटिव्ह रुग्ण गायब, 'या' जिल्ह्यातील लोकांची उडाली झोप
पंजाब सरकारकडून महाराष्ट्र सरकारला रोज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय?
रुग्णांचा पत्ता अचूक न घेतल्याने खळबळ.

प्रतिनिधि :- बल्खी आसद
नांदेड: राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामध्ये आनंदाची बातमी म्हणजे राज्यातील काही जिल्हे ग्रीन झोनमध्ये देखील आले आहेत. त्यामुळे काही लोकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे. दरम्यान नांदेड शहरात घडलेली चूक मोठी महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लंगर साहिब मधील संशयित असलेल्या रुग्णांना क्वारंटाईन ठेवण्याऐवजी त्यांना सोडून दिलेली चूक नांदेडकरांच्या मुळावर उठणारीच म्हणावे लागेल. त्या ४ बेपत्ता कोरोनाग्रस्तांमुळे रुग्णांची संख्या आता किती वाढणार? हा प्रश्न सर्वसामान्याना भेडसावू लागला आहे. राज्यातील प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा चांगले काम करत असून काही चुकीचा, बेजबाबदार आणि गलथान कारभाराबद्दल नांदेडकर संतप्त झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने सुरवातीला लॉकडाउनमध्ये चांगले काम केले होते. मात्र हळूहळू त्यात सूट दिल्याने कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. नांदेड शहर व संपूर्ण जिल्हा २० एप्रिलपर्यंत ग्रीन झोनमध्ये होता. त्यानंतर नांदेडमधील पीरबुर्हाण नगर भागातून एक ६४ वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर २८ रोजी सेलूची महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. या दोघांचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असताना प्रशासनाने खबरदारी घेणे अपेक्षित होते. त्यानंतर पंजाब येथे यात्रेकरूंना सोडण्यासाठी गेलेल्या चार चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
पंजाब सरकारकडून महाराष्ट्र सरकारला रोज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय?
दरम्यान, पंजाब येथून ७९ खासगी बसेस घेऊन नांदेड येथे दाखल झालेल्या त्या चालक व अन्य अधिकारी यांच्या बाबतीत योग्य ती काळजी घेणं गरजेचं होतं. त्या सर्व चालक व सोबत असलेल्या अधिकाऱ्यांची तपासणी केली गेली असती तर कोरोनाची लागण नेमकी कशी झाली ते प्रशासनाला समजले असते. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करणे ही घोडचूकच ठरली. जिल्हा प्रशासनाने मोठी अबदा ओढावून घेतली.
येथून पंजाब येथे गेलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पंजाब सरकारकडून महाराष्ट्र सरकारला रोज आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जात आहे. तेथील आरोग्यमंत्री ही आपल्या सरकारचा निषेध नोंदवित असून नुकसानाची दावा ठोकण्याची भाषा बोलू लागले आहेत. यावर नांदेड प्रशासन असो, किंवा सरकारमधील कोणालाही अद्याप उत्तर देता आले नाही. देशपातळीवर महाराष्ट्र सरकारला बदनामी सहन करावी लागत आहे. प्रशासनाचा बिनडोक कारभार राज्य सरकारला देशपातळीवर तोंडघशी पाडणारी ठरत आहे.
रुग्णांचा पत्ता अचूक न घेतल्याने खळबळ.
प्रशासनाने पुन्हा गंभीर चूक केली आहे. ती म्हणजे नांदेडकरांच्या मुळाशी उठणारी ठरत आहे. शनिवारी ज्या वीस जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले, अशांना अहवाल येईपर्यंत विलगीकरणात ठेवणे अपेक्षित होते. त्या वीसच्या वीस जणांना सोडून मोकळे झाले. बरे ही सोडून देताना त्यांचे मोबाईल नंबर व पत्ता तरी नोंद करून घ्यायला हवा होता. ते देखील घेतले नसल्याचे समजते आहे.
या प्रकारामुळे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना गुरुव्दारा परिसरात जाऊन शोध मोहिमेत लक्ष घालावे लागले. त्यामुळे सोळा जण हाती लागले. अन्यथा ते ही इतर चार जणांसारखे बेपत्ता होऊ शकले असते. अद्याप त्या चार बेपत्ता झालेल्या कोरोनाग्रस्ताचा ४८ तासांपेक्षा अधिक काळ लोटला, तरी पोलिसांना पत्ता लागू शकला नाही. कोरोनाग्रस्तांची शोधमोहीम सुरु असल्याचे वजिराबाद पोलिस ठाण्याचे संदीप शिवले यांनी सांगितले.
Comments
Post a Comment