नांदेडमध्ये कोरोनाचा पाचवा बळी, रुग्णांची संख्या 45 वर
नांदेडमध्ये कोरोनाचा पाचवा बळी, रुग्णांची संख्या 45 वरकरबला येथील ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
नांदेेड :- एक रुग्ण ( वय वर्ष 61) नांदेड शहरातील करबला भागातील असून. त्यास 8 मे रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे दाखल करण्यात आले होते. दि 9 मे रोजी पहाटे 04.30 वाजता सदर रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा तपासणीसाठी पाठविण्यात आला असता सदर रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
सकाळी 2 रुग्ण सापडल्यानंतर सायंकाळी पुन्हा 4 पाझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून, आता सायंकाळी मृत व्यक्तीचा पॉझिटिव्ह अहवालामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चार पैकी 3 जण हे रहमतनगरचे असून 1 जण माहुरचा आहे. शहरातच कोरोनाची लागण झाली असताना ग्रामीण भागातही कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने कोरोनाने त्या भागातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्याचे दिसते.
आज 9 मे रोजी सायंकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या एकूण 5 थ्रोट स्वॅब नुसार चारही पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त 5 पॉझिटिव रुग्णांपैकी नांदेड शहरातील 3 रुग्ण (2 पुरुष प्रत्येक केवळ वर्षे 14 आणि एक महिला वय वर्ष 32) हे तीन मे रोजी रहमतनगर नांदेड येथील कोरोना बाधित मृत महिलेच्या नजीकच्या संपर्कातील आहेत सदर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
तसेच माहूर तालुक्यातील कोविड केअर सेंटर येथे दाखल 1 रुग्णाचा (पुरुष वय वर्ष 64) स्वॅब तपासणीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे सदर याही रुग्णाची प्रकृती स्थिर आहे असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आज प्राप्त 5 पॉझिटिव्ह अहवालामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. पैकी 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्याची वाटचाल रेड झोन कडे होत असल्याकारणाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment