नांदेड आणखी 4 रुग्ण आढळले रुग्णांची संख्या झाली 44 वर

देगलूर नाका रहेमतनगर रूग्ण संपर्कातील : ३ 

 

माहूर नवा रूग्ण : १ 

 

नांदेडच्या 3 रुग्ण पैकी दोन रुग्ण 14 वर्षीय

नांदेड : जम्मू येथून नांदेडला आलेल्या दोन यात्रेकरूंना कोरोना ची बाधा झाल्याचे शनिवारी सकाळी 9 वाजता समोर आले. नगिनाघाट परिसरातून गुरुवारी सायंकाळी काही यात्रेकरूंचे स्वब तपासणीसाठी घेतले असता त्यातील हे दोघे बाधित असल्याचे समोर आले होते  सायंकाळी पुन्हा 4 पाझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चार पैकी तीन जण हे रहमतनगरचे असून एक जण माहुरचा आहे. शहरातच कोरोनाची लागण झाली असताना ग्रामीण भागातही कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने कोरोनाने त्या भागातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्याचे दिसते. आज 9 मे रोजी सायंकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या एकूण 4 थ्रोट स्वॅब नुसार चारही पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त 4 पॉझिटिव रुग्णांपैकी नांदेड शहरातील 3 रुग्ण (2 पुरुष प्रत्येक केवळ वर्षे 14 आणि एक महिला वय वर्ष 32) हे तीन मे रोजी रहमतनगर नांदेड येथील कोरोना बाधित मृत महिलेच्या नजीकच्या संपर्कातील आहेत सदर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तसेच माहूर तालुक्यातील कोविड केअर सेंटर येथे दाखल एका रुग्णाचा (पुरुष वय वर्ष 64) स्वॅब तपासणीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे सदर याही रुग्णाची प्रकृती स्थिर आहे 

असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. आज प्राप्त 4 पॉझिटिव्ह अहवालामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 44 वर पोहोचली आहे. नांदेड जिल्ह्याची वाटचाल रेड झोन कडे होत असल्याकारणाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांची वाढत चालली असून माहुरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तो कोणाच्या संपर्कात आला,तो बाहेरुन आला होता का किंवा अगोदरच्या कोरोना रुग्णांच्या निकटवर्तीयातील तो व्यक्ती आहे का? असे अनेक प्रश्न यानिमिताने उपस्थित केले जात आहे. 

जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये तसेच जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान