लॉक डाऊनच्या काळात जन्मलेल्या मुलीच्या स्वागतासाठी लॉयन्सच्या डब्यासोबत वाटप करण्यासाठी दिली 30 किलो जिलेबी
कोरोनाच्या लॉक डाऊनच्या काळात जन्मलेल्या मुलीच्या स्वागतासाठी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुनील भालेराव पाटील यांनी माता वासवी जन्मोत्सवाचे औचित्य साधून ॲड. दिलीप ठाकूर यांच्याकडे लॉयन्सच्या डब्यासोबत वाटप करण्यासाठी 30 किलो जिलेबी देऊन एक नवीन पायंडा पाडला. मुखेड /प्रतिनिधि :- बल्खी आसद
मुलगा जन्मला पाहिजे असा हट्ट धरून गर्भपात करण्याची इच्छा असणा-यांची संख्या कमी नाही. असे असताना मुलगा मुलगी असा भेदभाव न करता जन्मलेल्या पहिल्याच मुलीचे जाहीर कौतुक करण्याचे धारिष्ट सुनील भालेराव पाटील यांनी केले. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कोमल सुनिल भालेराव पाटील यांची अंकुर हॉस्पिटल रुग्णालयात प्रसूती झाली. नवजात बाळाला पाहण्यासाठी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर गेले असता सुनील भालेराव पाटील यांनी जिलेबी वाटण्याची इच्छा व्यक्त केली. लॉक डाऊन च्या काळात आलेल्या प्रत्येक सणाला लॉयन्सच्या डब्या सोबत वेगवेगळे गोड पदार्थ देण्यात येतात. रविवारी माता वासवी कनकेश्वरी देवी जन्मोत्सव असल्यामुळे सुनील भालेराव पाटील यांच्या सहकार्याने लॉयन्सच्या डब्या सोबत 700 गरजूंना जिलेबी वाटप करण्यात आली. लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे सतत 38 व्या दिवशी 700 गरजूंना जेवणाचे डबे देण्यात येत आहेत . आतापर्यंत 23455 डब्यासाठी नोंदणी झाली असून 21580 डबे वितरीत करण्यात आले आहे. नवीन नोंदणी करण्याऱ्या मध्ये संभाजीराव सूर्यवंशी तळणीकर, द्वारकादासजी साबू यांनी प्रत्येकी 200 डबे, याव्यतिरिक्त पारस कन्स्ट्रो हब 150 डबे, ओम बाळासाहेब बन्नाळीकर, जयसिंग तातेराव हंबर्डे विष्णुपुरी, कु. स्पृहा सुजय बच्चेवार, डॉ निषाद नानासाहेब जोशी, नंदूसिंह तंवर, प्रभाकर श्रीहरी वाघमारे अमरावती, अभिजित नागनाथ चिल्लरगे मुंबई, राम पाटील खतगावकर, कै. कोंडाबाई नारायण अकमार यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी 100 डबे तसेच ज्ञानेश्वर गोविंद काप्रतवार, समीर आंबेकर, शिवाजी पवार, ॲड. श्याम डांगे, प्रसाद प्रदीपराव पंढरपूरकर, हृदय राहुल पवार सोलापूर,तानाजी भुजंगराव मुखेडकर, आदेश ओमप्रकाश गटानी, सौ. चंद्रकला अशोकराव बिरादार, राजकुमार दमकोंडवार व संजय देशमुख यांनी प्रत्येकी 50 डब्यासाठी नोंदणी केली आहे. लॉयन्स सेंट्रलकडे सध्या फक्त दोन दिवस पुरतील इतके 1875 डबे शिल्लक असल्यामुळे इच्छुक अन्नदान दात्यांनी किमान 50 ते 100 डबे देण्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष लॉ. डॉ. विजय भारतीया, उपाध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, सचिव लॉ. डॉ. मोहन चव्हाण, कोषाध्यक्ष लॉ. शिवा शिंदे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment