3 मे नंतर प्रत्येक झोनप्रमाणे मोकळीक देऊ, पण झुंबड नको : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

3 मे नंतर प्रत्येक झोनप्रमाणे मोकळीक देऊ, पण झुंबड नको : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, 'जनता ही राज्य आणि देशाची संपत्ती आहे. ३ मे नंतर लॉकडाऊनचं काय हा प्रश्न विचारला जात आहे. त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. अर्थचक्र रुतलं मान्य, पण तुम्ही सगळे नागरिक ही राज्याची संपत्ती आहे. जनता वाचली पाहिजे. ऑरेंज, ग्रीनमध्ये अटी-शर्तींसह व्यवहारांना परवागनी दिली आहे. ऑरेंज झोनमधली काही जिल्ह्यांमध्ये काय करु शकतो याचा विचार सुरु आहे. ग्रीन झोनमधल्या अटी-शर्ती हळूहळू काढत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ३ तारखेनंतर आपण आतापेक्षा अधिक मोकळीक देणार आहोत, झोननुसार मोकळीक दिली जाईल, पण झुंबड-घाई-गडबड नको, अन्यथा पुन्हा बंधनं टाकावी लागतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले


मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे...

>> रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी, ऑरेंज झोन म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी आणि ग्रीन झोन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता नाही.
>> राज्यात कंटेन्मेंट झोनमध्येच करोना रुग्णांची संख्या वाढली
>> ७५ ते ८० टक्के पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये करोनाचे लक्षणं आढळली नाहीत, त्यांच्यावरही उपचार सुरू
>> मुंबईतील झोपडपट्ट्यात ऑक्सिमीटरने तपासणी सुरू; दोन लाखाहून अधिक लोकांची तपासणी केली
>> मुंबईत २७२ लोकांची ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याचं दिसून आलं; त्यांच्यावरही उपचार सुरू
>> २० हजाराहून अधिक लोकांनी कोविड योद्धा होण्याची इच्छा दाखवली; तर १० हजार लोकांनी प्रत्यक्ष कामाची तयारी दाखवली
>> मुबई आणि कल्याण-डोंबिवलीच्या महापौरांचीही कोविड योद्धा म्हणून काम करण्याची इच्छा
>> संकटाच्या काळात खासगी डॉक्टरांनीही पुढे यावं
>> करोना झाला म्हणजे सर्व काही संपलं असं नाही, व्हेंटिलेटरवरील रुग्णही बरे झाले आहेत
>> करोनाची लक्षणे आढळताच फिवर क्लिनिकमध्ये तात्काळ जा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान