नांदेड आणखी 3 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह एकूण संख्या 38 वर
कामाशिवाय बाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे:-
डॉ. नीळकंठ भोसीकर
अबचलनगर भागात भितीचा वातावरण
प्रतिनिधि :-
नांदेड :- ०८ मे रोजी मध्यरात्री प्राप्त झालेल्या एकूण २४ स्वॅब नुसार २० अहवाल निगेटिव्ह तर ३ तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे.
पॉझिटिव प्राप्त अहवालानुसार दोन रुग्ण महिला वय वर्ष 36 आणि पुरुष वय वर्षे 38 हे अबचलनगर नांदेड आणि १ रुग्ण पुरुष वय वर्ष 35 हा रविनगर येथील रहिवासी आहे.अबचलनगर येथील २, रवी नगर कौठा १ असे पहिला चालकाच्या संपर्कातून बाधा झाल्याच महित झाले आहे . आज २० पैकी १७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत हे सर्व रुग्ण हे अबचलनगर येथील सुरुवातीस बाधित असलेल्या रुग्णांच्या निकटवर्तीय संबंधातील आहेत. काल दिनांक 7 मे रोजी कोव्हिड १९ आजाराच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांचे दुसऱ्यांदा थ्रोट स्वॅब घेण्यात आलेले होते, यापूर्वी प्रथमता घेण्यात आलेले त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेले होते.
पहिल्या कोरोना बाबतीत रुग्णाच्या संपर्कातील हे नवीन ३ रुग्ण आढळल्याने नांदेड मध्ये आता कोरोना आजार पसरण्यास सुरुवात झाली आहे.
सध्यास्थितीत सदर तिन्ही रुग्णांवर यात्रीनिवास कोविंड केअर सेंटर येथे उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज प्राप्त ३ पॉझिटिव्ह अहवालामुळे नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली आहे.
जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Comments
Post a Comment