पंजाबमधून नांदेडला परतलेल्या 20 जणांना कोरोनाची बाधा

पंजाबमधून नांदेडला परतलेल्या 20 जणांना कोरोनाची बाधा

आतापर्यंत 26 कोराना बाधित रुग्ण आढळले असून, 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुखेड/ प्रतिनिधि :- बल्खी आसद


नांदेड :  नांदेड येथे 20 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. शनिवारी सकाळी त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नांदेडमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 24 वर पोहोचली आहे. दोघांचा मृत्यू झाला आहे.

श्री गुरुद्वारा लंगर साहिब येथील परिसरातील ९७ व्यक्तींचे ३०एप्रिल व ०१मे रोजी स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते.  त्यांच्या घशाच्या द्रवाचे, स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, त्यांची चाचणी केल्यानंतर 20 जणांना कोरोनाचे लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर २५ जन निगेटीव्ह आहेत. ११ स्वँब हे अनिर्णयीत आहेत. तर उर्वरित ४१ जनाचे आवहाल प्रतिक्षेत आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. यामुळे नांदेड जिल्हा रेड झोन मध्ये आला आहे. 

दिनांक 2 मे रोजी सकाळी 9 वाजता कोरोना विषाणू संदर्भात 1235 संशयितांची नोंद झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण घेण्यात आलेले 1120 व त्यापैकी 1009 निगेटिव्ह अहवाल आले आहेत. आज पर्यंत 6 आणि नव्याने आलेल्या 20 रुग्णांचा असे एकूण 26 पॉझिटिव्ह आहेत. यापूर्वी शुक्रवारी तीन जणांना कोरोनाची लागण झाली होती. 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पीर बुऱ्हाननगर नांदेड आणि सेलू ता. परभणी येथील महिला रुग्णाचा औषधिस प्रतिसाद न दिल्यामुळे सदर दोन्ही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सदर सर्व व्यक्तींना एन.आर. आय. भवन कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलेले आहे. मोठ्या प्रमाणात विषाणू बाधित झालेल्या गुरुद्वारा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसेंदिवस नांदेड मध्ये रुग्णांची वाढ होत असल्याने सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान