नांदेड आणखी 2 रुग्ण आढळले जम्मुचे दोन यात्रेकरू नांदेडला कोरोनाग्रस्त!

नांदेड आणखी 2 रुग्ण आढळले रुग्णांची संख्या झाली 40 वर 

मुखेड /प्रतिनिधि :- बल्खी आसद

 नांदेड आणखी 2 रुग्ण आढळले रुग्णांची संख्या झाली 40 वर

 नांदेड दि.०९ मे: जम्मू येथून नांदेडला आलेल्या दोन यात्रेकरूंना कोरोना ची बाधा झाल्याचे शनिवारी सकाळी समोर आले. नगिनाघाट परिसरातून गुरुवारी सायंकाळी काही यात्रेकरूंचे स्वब तपासणीसाठी घेतले असता त्यातील हे दोघे बाधित असल्याचे समोर आले आहे. पॉझिटिव प्राप्त अहवालानुसार 2 रुग्ण (पुरुष वय वर्ष 55 आणि 57) हे जम्मू काश्मीर येथील रहिवासी असून ते नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी आले होते. सध्या स्थितीत सदर दोन्ही रुग्णांवर महसूल इमारत कोविंड केअर सेंटर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. आज मध्यरात्री दिनांक 9 रोजी प्राप्त झालेले एकूण 54 थ्रोट स्वॅब नुसार 49 अहवाल निगेटिव्ह तर 2 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले तसेच 3 अहवाल हे अनिर्णित असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

 होळी सणादरम्यान नांदेडमधील होला महल्ला उत्सवासाठी देशातील वेगवेगळ्या भागातून शीख यात्रेकरू नांदेडमध्ये दाखल झाले. टप्याटप्प्याने हे यात्रेकरू नांदेडला दाखल होत असताना तिकडे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून देशभरात लॉक डाऊन सुरू झाले. प्रवासी वाहतुकीची खाजगी व सरकारी साधने बंद करण्यात आली. दळणवळण ठप्प झाल्यामुळे सुमारे चार हजार यात्रेकरू नांदेडला अडकून पडले. काही दिवसापूर्वी पंजाब राज्यातील यात्रेकरू शासनाच्या परवानगीने त्यांच्या गावी पोहचले असले तरी इतर बऱ्याच राज्यातील यात्रेकरू अजूनही नांदेडला अडकून आहेत. दरम्यान, नांदेडला अडकलेल्या यात्रेकरूंची स्क्रिनिंगद्वारे वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. परंतु येथून पंजाबला गेल्यानंतर बरेच प्रवासी कोरोनाग्रस्त निघाल्याने आढळल्याने नांदेडला त्यांच्या संपर्कात आलेल्या व येथे थांबलेल्या यात्रेकरू व इतर व्यक्तींचे स्वब घेणे सुरू आहे. नगिनाघाट व आसपासच्या परिसरातून आतापर्यंत शंभरहून अधिक व्यक्तींचे स्वब घेण्यात आले असून या परिसरात थांबलेले जवळपास ३० जण आतापर्यंत कोरोना संक्रमित झाल्याचे आढळले. त्यामुळे प्रशासनाकडून या परिसरात बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वब घेणे सुरू झाले आहे

 

जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच, मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

 

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान