पंजाबमधून नांदेड परतलेले तीन ट्रॅव्हल्स चालक कोरोनाग्रस्त!

पंजाबमधून परतलेले तीन ट्रॅव्हल्स चालक कोरोनाग्रस्त!

कोरोनाग्रस्ताची संख्या झाली 6 

जनतेने अत्यावश्यक कामाशिवाये घरा बाहेर पडू नये

नांदेड : पंजाबला यात्रेकरूंना सोडून परतलेल्या ट्रॅव्हल्सच्या तीन चालकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पाठवलेल्या संशयितांच्या स्वॅबपैकी 3 लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली. नवीन तिन्ही रुग्ण पंजाब येथे यात्रेकरूंना सोडून परतलेले नांदेडमधील बसचालक असल्याचे मीडिया समन्वयक व उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले. 
गुरुवारी त्याच्या स्वबचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. शुक्रवारी सकाळी त्याचा अहवाल आला. नांदेडमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंच्या एका तुकडीला पाच दिवसांपूर्वी पंजाबला नेऊन सोडण्यात आले. दहा खाजगी ट्रॅव्हल्सने हे प्रवाशी गेले होते. यासाठी शासनाने परवानगीही दिली होती. राजकीय लोकांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये या यात्रेकरूंना निरोप देण्यात आला. पंजाब येथून परतल्यानंतर त्या ट्रॅव्हल्स हद्दीबाहेर थांबवून त्यात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तसेच बसचालकांना तेथूनच थेट संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. तेथे गुरुवारी त्यांचा स्वब घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नांदेडमधील कोरोना बाधितांची संख्या आता सहावर गेली असून त्यातील नांदेडच्या पीर बु-हाननगर येथील ६४ वर्षीय वृद्ध तसेच सेलू येथील ५५ वर्षीय महिला अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. बाधित चारही जण आता पंजाब येथून परतलेले चालक आहेत. अबचलनगर येथील एका चालकाला कोरोनाची बाधा झाल्याने त्याच्यावर पाच दिवसापासून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित तिघांवरही डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान