Posts

Showing posts from July, 2021

आॅसम चाइल्डहुड पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमच्या शाळेतील विद्यार्थी रिजवान नविदोद्दीन सय्यद दहावीत ९९.४० टक्के घेऊन उत्कृष्ट यश संपादन

Image
 आॅसम चाइल्डहुड पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमच्या शाळेतील विद्यार्थी रिजवान नविदोद्दीन सय्यद दहावीत ९९.४० टक्के  घेऊन उत्कृष्ट यश संपादन मुखेड / प्रतिनिधी        शहरातील आॅसम चाइल्डहुड पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमच्या शाळेतील विद्यार्थी सय्यद रिजवान सय्यद नविदोद्दीन याने दहावीत ९९.४० टक्के घेऊन उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.        कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परिक्षा होऊ शकल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्य मापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल शुक्रवारी दि.१६ जुलै रोजी जाहिर करण्यात आला. यात शहरातील आॅसम चाइल्डहुड पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमच्या शाळेतील विद्यार्थी सय्यद रिजवान सय्यद नविदोद्दीन याने दहावीत एकूण ५०० पैकी ४९७ गुण, ९९.४० टक्के घेऊन उत्कृष्ट यश संपादन केले. रिजवानचे आजोबा सय्यद हमीद हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. तर वडील सय्यद नविदोद्दीन टि.वी.मेकॅनिक आहेत. परिस्थितीशी संघर्ष करत सय्यद रिजवान ने यश संपाद...

इन्साफ किनवट ची कार्यकारिणी जाहीर

Image
  ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ किनवट ची कार्यकारिणी जाहीर ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ किनवट ची एक बैठक दि.4 जुलाई रोजी इन्साफचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांच्या अध्यक्षतेखाली किनवट चे एन-के गार्डन मध्ये आयोजित करण्यात आली होती, सदर बैठकीत किनवट तालुका,शहर,युवक,स्टूडेंट विंग ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी इन्साफचे  जिल्हा उपाध्यक्ष प्रा.जुबैर खान,मोईन कुरेशी,नांदेड शहराध्यक्ष हाफीज शाहेद उल इस्लाम,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली आहे. यात,किनवट तालुका अध्यक्षपदी शेख अय्यूब (बिल्डर), ता.उपाध्यक्ष मो. एजाज़ मो. इसाक,ता.सचिव फ़हीम क़ुरैशी, शहर अध्यक्ष शेख आसिफ शेख रफ़ीक,शहर उपाध्यक्ष तौफीक अज़ीज़ गौड़,शहर सचिव सैयद इरफान,कोषाध्यक्ष मिर्ज़ा साबेर बेग,उमर चव्हाण तर सल्लागार म्हणून नसीर तगाले (सम्पादक आजकी न्यूज़)यांची सर्वानुमते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. तसेच युवक तालुका अध्यक्ष पदी शेख समीर, युवक शहर अध्यक्ष शरद कोटपल्लीवार, युवक तालुका उपाध्यक्ष संजय कोतुरवार, युवक ता. सचिव मो. सोहेल, युवक शहर उपाध्यक्ष अमीर खान,युवक शहर सचिव शेख अज़हर,युवक स...